( जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट यांचा सामाजिक स्त्युत उपक्रम)
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- कविता धुर्वे
राळेगाव:-मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कळंब तालुक्यातील माऊली वृद्धाश्रम धोत्रा व ग्रामीण रुग्णालय राळेगांव येथील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मनसेच्या वतीने भोजन वितरीत करण्यात आले.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संस्थापक अध्यक्ष मराठी हृदयसम्राट राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कळंब तालूक्यातील माऊली वृद्धाश्रमात वृध्दां सोबत केक कापुन मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करून नंतर तेथील वृध्दांना मिष्टान्नभोजन देण्यात आले.

त्यानंतर राळेगांव ग्रामीण रुग्णालयातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना सुध्दा मोफत भोजन वितरीत करण्यात येवुन सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा उपक्रम मनसे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट यांनी राबविला.मनसे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर राहत असुन मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी आपला वाढदिवस समाजिक उपक्रमांनी साजरा करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते. त्याच अनुषंगाने मनसेच्या वतीने कळंब येथील वृद्धाश्रमातील वयोवृद्ध नागरिक, आणी ग्रामीण रुग्णालयातील रुग्ण व नातेवाईकांना मोफत जेवण वितरीत करण्यात येवुन राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी सुरज लेनगुरे,आरिफ शेख, संदीप गुरनुले,संदीप कुटे,शैलेश आडे, सचिन आत्राम,रोशन गुरुनुले,मंगेश मोहुर्ले,राहुल भोयर,भोजराज चौधरी, उमेश पेंन्दोर,गौरव चवरडोल,स्वप्नील नेहारे,ओम मडावी,अंकित चौधरी, कुणाल चिंचालकर,कुणाल मोहुर्ले, तुषार वाघमारे,सुहास उमाटे,रोशन गुरनुले,खुशाल राऊत सह अन्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.


