पोलीस निरीक्षक शितल मालटे यांची धडक कारवाई
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- कविता धुर्वे
राळेगाव:-तालुक्यातील गोपालनगर पारधी बेड्यावर दिनांक १३-०६-२५ रोजी सकाळी ०७:०० वाजता पोलिस स्टेशन राळेगांव हद्दीतील गोपालनगर पारधी बेडा येथे प्रो रेड केले असता आरोपी किसन मेहबूब काळे वय ३१ वर्ष रा. गोपालनगर यांचे घरात झडतीमध्ये घरासमोरील बाथरूम मध्ये ०३ निळ्या रंगाच्या प्लास्टिक ड्रम मध्ये प्रत्येकी १०० लिटर प्रमाणे ३०० लिटर सडवा मोहाचा किंमत ३०,०००/- रू आणि आरोपी पदम विठू काळे वय ३६ वर्ष रा. गोपालनगर यांचे घर झडतीमध्ये घराचे मागे ०२ निळ्या रंगाच्या प्लास्टिक ड्रम मध्ये प्रत्येकी १०० लिटर प्रमाणे २०० लिटर सडवा मोहाचा किंमत २०,०००/- रू असा एकूण ५०,०००/- रू चा मुद्देमाल मोक्यावर नष्ट करण्यात आला. आरोपीला माहिती मिळताच घटनास्थळावरून आरोपी पळून गेले.

आरोपीतांवर पो.स्टे. येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहे,पोलिस निरीक्षक शितल मालते यांचे मार्गदर्शनामध्ये एएसआय अनंता इरपाते, एलएचसी प्रिया बारेकर, एनपीसी रूपेश जाधव यांनी कारवाई केली.

