महाक्रांती न्यूज नेटवर्क :-वर्धा विभाग
राष्ट्रीय सेवा योजना ,रेड रिबन क्लब , व जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध कक्ष जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा, यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय युवा दिन तसेच अँटी रॅगिंग सेल चे उद्घाटन कार्यक्रम पार पडला.
यावेळी अध्यक्षस्थानावरुन बोलताना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.सोनाली खांडेकर यांनी आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन युवा दिनाचे महत्त्व विशद केले तसेच तरुणांच्या भूमिका आणि योगदान ओळखणे, त्यांना प्रोत्साहन देणे, तरुणांशी संबंधित असलेल्या समस्यांबाबत त्यांच्यात जागरूकता वाढविणे आणि त्यांच्या विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करणे हा उद्देश आंतरराष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यामागचा आहे.असे विचार व्यक्त केले.
तर प्रमुख मार्गदर्शक – राजश्री धनवीज समुपदेशक, सावंगी रुग्णालय यांनी विद्यार्थ्यांना एच आय व्ही संदर्भामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, तर डॉ. कल्पना बंडिवार यांनी अँटी रॅगिंग सेल विषयी माहीती दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी व रेड रिबन क्लबचे समन्वयक डॉ. रवींद्र सहारे यांनी केले. या प्रसंगी कार्यक्रमाचे संचालन कल्याणी गाढवे तर आभार सृष्टी टाले हिने मानले.या कार्यक्रमाला डॉ.कमलेश मानकर सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

