— पुलगाव धान्य गोदामातील अधिकारी ना धन्य चोरी करताना रंगेहात पकडले.
(पुलगाव):- विदर्भ प्रमुख युसूफ पठाण
जनतेच्या हक्कासाठी नेहमी सजग राहणारे आमदार राजेश बकाने यांनी आज पुलगावमधील शासकीय धान्य गोदामावर अचानक भेट देऊन तिथे होत असलेल्या धनयचोरी चा मोठा गैरप्रकार उघडकीस आणला.
या भेटीदरम्यान गोदाम व्यवस्थापक प्रतीक भगत हा स्वस्त धान्याच्या साठ्यात कपात करताना पकडला गेला. गोरगरिबांसाठी असलेल्या धान्यापैकी तो प्रत्येक कट्ट्यातून अर्धा किलो धान्य कमी देत होता — म्हणजेच क्विंटल मागे १ किलोची थेट चोरी होत असल्याचे उघडकीस आले.
ही धान्य कपात गरीबांना त्यांच्या हक्काच्या धान्यापासून वंचित ठेवणारी गंभीर बाब असून, हा प्रकार शांतपणे सुरू असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले. गरीबांच्या ताटातील अन्नावर डल्ला मारण्याचा हा प्रकार आमदार बकाने यांच्या तत्परतेमुळे उघड झाला.
अरेरावीची हद्द — लोकप्रतिनिधींसोबतही उद्धटपणा
या कारवाईदरम्यान, जेव्हा आमदार बकाने यांनी व्यवस्थापक प्रतीक भगत याला प्रश्न विचारले, तेव्हा त्याने थेट मजुरीची भाषा करत अरेरावी केली. एका लोकप्रतिनिधींसोबतच जर तो असा उद्धट वर्तन करू शकतो, तर सामान्य स्वस्त धान्य दुकानदारांशी किंवा लाभार्थ्यांशी तो कसा वागत असेल, याचा अंदाज सहज येतो.
यामुळे, केवळ धान्य कपातीचाच नव्हे तर त्याच्या वर्तनाचा, इतरांवरील दबावाचा आणि संभाव्य गैरवर्तनाचा सुद्धा तपास व्हावा, अशी मागणी आमदार बकाने यांनी अधिकाऱ्यांकडे केली.
तातडीची प्रशासनिक पावले

घटनेनंतर आमदार बकाने यांनी त्वरित जिल्हाधिकारी वर्धा, धान्य पुरवठा अधिकारी वर्धा व तहसीलदार देवळी यांना संपर्क साधून घटनास्थळी बोलावले. त्यांनी संपूर्ण गोडाऊनची स्विच तपासणी (सील करून सखोल चौकशी) करण्याचे आदेश देण्याची मागणी केली.
तसेच, प्रतीक भगत या दोषी व्यवस्थापकावर तात्काळ बडतर्फी व गुन्हा दाखल करण्याची स्पष्ट मागणी केली.
आमदार बकाने यांचा ठाम इशारा
“गरीबांच्या ताटातील अन्न कमी करण्याचा अधिकार कुणालाही नाही. जो कोणी भ्रष्टाचार करेल, जनतेचा हक्क हिरावून घेईल, त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई होईल. हे सरकार गरीबांच्या पाठीशी उभे आहे, आणि मीसुद्धा शेवटपर्यंत उभा राहीन,” असे आमदार बकाने यांनी ठामपणे सांगितले.
जनतेत कौतुकाची लाट
या तातडीच्या कारवाईनंतर पुलगाव परिसरात आणि वर्धा जिल्ह्यात आमदार बकाने यांच्या सजगतेची चर्चा रंगली आहे. गरीबांचा विश्वास संपादन करणारे, अन्यायाला तातडीने आळा घालणारे आणि कोणाच्याही दबावाखाली न येणारे लोकप्रतिनिधी अशी त्यांची प्रतिमा अधिक दृढ झाली आहे.

