विदर्भ विभाग् प्रतिनीधी: – युसूफ पठाण
अकोला येथे राज्यस्तरीय KSPL साव कलाल समाजातील पुरुष व महिलांच्या क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या, त्यात पुरुष व महिलांचे एकुण 35 संघ समाविष्ट झाले होते पैकी 10 संघ महिलांचे विविध जिल्हयातुन आले होते. त्यात वर्धा सुपर क्विन्स हया महिला संघाने लगातार चार सामने खेळुन अंतिम सामन्यात यवतमाळ संघासोबत शक्तिशाली व धुवाधार खेळाचे प्रदर्शन करीत दणदणीत विजय प्राप्त करून प्रथम बक्षीस 31,000 रु पटकावले. प्रथम सामन्यात परिक्षा डगवार ही सामनावीर ठरली. दुसऱ्या सामन्यात वैभवी शेंडे हि सामनावीर ठरली वैभवी ही सलग तीन सामन्यात नाबाद राहून धुवाधार बॅटिंग चे शक्तिशाली प्रदर्शन केले. तिसर्या सामन्यात परत परिक्षा डगवार ने उत्कृष्ट बाॅलींग करून सामनावीर होण्याचा मान पटकावला. आणि अंतिम सामन्यात रक्षा पेठे ने लगातार बळी घेऊन सामनावीर होण्याचा बहुमान मिळवला. तसेच अंतीम सामन्यात डॉ परिक्षा डगवार हिला मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बाॅलर म्हणून पुरस्कृत करण्यात आले.वर्धा सुपर क्विन्स च्या सर्व खेळाडूंचे खुप खुप अभिनंदन. कर्णधार सौ.रंजना जरोदे व उपकर्णधार डॉ परिक्षा डगवार हयांच्या नैत्रृत्वाखाली मेघा जमणारे,वैभवी शेंडे, अंजुमा धामंदे,रक्षा पेठे, उज्वला पेठे, शितल पहाडे, उज्वला टाकळकर, लिना जमणारे, कोमल लोहकपुरे, व अपूर्वा सोनोने ह्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


