वर्धा विभाग प्रतिनीधी: – युसूफ पठाण
तीन दिवसीय कार्यक्रमात १३ विविध उपक्रमांचे यशस्वी आयोजन.•

वर्धेबरोबरच संपूर्ण विदर्भातील युवकांचा कार्यक्रमात सहभाग.• २०० युवकांच्या रहिवासी शिबीरचे आयोजन.वर्धा,युवकांच्या सुप्त गुणांना वाव देण्याकरिता तसेच त्यांच्यातील एक चांगला कलाकार वक्ता तसेच अभ्यासू व्यक्तिमत्व समाजासमोर आणण्याच्या अनुषंगाने तसेच त्यांना त्यांच्या हक्काचा मंच मिळवून देण्याकरिता वर्धा येथे २०२५ चे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला संपूर्ण विदर्भातून तसेच वर्धा जिल्ह्यातून सुमारे २५००० युवकांची उपस्थिती लाभली. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन दिनांक ९,१०,११,१२, जानेवारी ला वर्धेतील चरखा गृह येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्राचे राज्यमंत्री डॉ पंकज भोयर व देवळी पुलगाव विधानसभेचे आमदार राजेश बकाने तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या विशेष उपस्थितीत पार पडले. राज्यमंत्री पंकज भोयर यांनी या संपूर्ण तीन दिवसीय कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवून कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करून वर्धेतील युवकांना या तीन दिवसीय कार्यक्रमाच्या शुभेच्छा दिल्या.यामध्ये पहिल्या दिवशी भारतातील नामवंत डीआरडीओ च्या संस्थेतील डायरेक्टर व वैज्ञानिक मकरंद जोशी यांनी युवकांना मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे सायंकाळी वर्धा जिल्ह्यातील संपूर्ण युवकांकरिता युथ पार्लमेंट चे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला वर्धेतील अनेक युवकांनी भाग घेऊन देशाच्या चालू घडामोडी वर विशेष चर्चा करून भारतीय संसदेचे प्रतिकृती स्वरूप आपल्या कलेचे प्रदर्शन केले. या कार्यक्रमाला वर्धेतील नागरिकांनी भरपूर पसंती दिली तसेच या कार्यक्रमाच्या वेळी विविध राजकारणी पक्षातील नामवंत कार्यकर्तेही व नेते देखील पाहायला मिळाले.दुसर्या दिवशी सकाळी वर्धेतील बहुचर्चित असलेल्या आयटी पार्क चे कार्यकारी संचालक यांनी मार्गदर्शन केले. वर्धेतील सध्याच्या परिस्थितीला पाहून युवकांनी विविध क्षेत्रांमध्ये आपले वर्चस्व स्थापित करण्याकरिता उद्योगाला आधार बनवून पुढे यावे, तसेच आयटी पार्क वर्धा च्या भविष्यातील उपक्रमांना वर्धेतील युवकांनी सोबत मिळून काम करावे असे मार्गदर्शनात्मक आव्हान वर्धेतील युवकांना त्यांनी केले. त्याच संध्याकाळी वर्धेतील कलेचा व प्रतिभेचा मंच मानला जाणारा वर्धाज गॉट टॅलेंट हा कार्यक्रम पार पडला, यामध्ये विविध क्षेत्रातील युवकांनी आपल्या कलेचे प्रदर्शन केले. ज्यामध्ये संपूर्ण वार्धेकाराना विविध कलेचे प्रात्याक्षित बघायला मिळाले. ज्यामुळे वर्धेकरांनी या कार्यक्रमाचा चांगलाच आनंद लुटला. इतकेच नव्हे तर या कार्यक्रमाच्या शेवटी वर्धा व नागपुरातील प्रसिद्ध रॅपर कम्युनिटी च्या माध्यमातून वर्धा विस्डम या कार्यक्रमाने युवकांमध्ये वेगळाच जोश भरला. यात विशेष प्रकारच्या गाण्यांची प्रस्तुती प्रेक्षकांनी पहिल्यांदाच पाहिली.तिसऱ्या दिवशी महाराष्ट्रातील भारतीय थल सेनेचे आर्मी रिक्रुटमेंट ऑफिसर कर्नल अंशीत श्रीवास्तव यांच्या माध्यमातून विशेष मार्गदर्शन करण्यात आले ज्यामध्ये वर्धेतील संपूर्ण युवकांना भारतीय सेनेमध्ये भरती होण्याकरिता विविध संधी तसेच परीक्षांची तयारी करण्याच्या संदर्भात विशेष मार्गदर्शन करण्यात आले. इतकेच नव्हे तर इंडियन आर्मीच्या वतीने संपूर्ण युवकांना विविध पोस्टर डायरी मार्गदर्शन पुस्तिका यासारख्या विविध वस्तूंचे वितरण करण्यात आले. यानंतर संपूर्ण युथ फेस्ट चा समारोप कार्यक्रम पार पडला. यात युथ पार्लमेंट व वर्धाज गॉट टॅलेंट चे बक्षीस वितरण करण्यात आले. यामध्ये विजेत्याना रोकड बक्षीस, सर्टिफिकेट, व सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. यानंतर रात्री महिला सक्षमीकरणाच्या विषयाला अनुसरून फेस्टिवलच्या वतीने महिला संगीत कलाकार सलोनी यांच्या माध्यमातून एक धमाकेदार संगीत संधीचे आयोजन करण्यात आले. ज्यामध्ये संपूर्ण वर्धेतील सुमारे साडेपाच हजार युवकांनी मराठी व भारतीय संस्कृतीतील संगीताचा आनंद लुटला वर्धा जिल्ह्यात इतक्या मोठ्या प्रमाणात युवकांच्या एकत्रीकरणाचा संगीत संध्येचा हा वर्धेतील पहिलाच कार्यक्रम ठरला.त्यानंतर 12 जानेवारी ला राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने वर्धेतील सुमारे 200 युवकांनी राष्ट्रीय युवा दिन हा भारतीय सेनेच्या सोबत साजरा केला. त्याकरिता वर्धेतील युवकांनी पुलगाव येथील केंद्रीय दारूगोळा भंडार मध्ये संपूर्ण दिवस साजरा केला ज्यामध्ये भैरव बाबा मंदिर, दारूगोळा संग्रहालय, शक्ती स्मारक, अशा विविध ठिकाणी युवकांनी भेटी देऊन भारतीय सेनेतील गौरवशाली सैनिकांच्या बलिदान पर गोष्टी व त्यांच्या सेना मेडल प्राप्त अशा सैनिकांच्या भेटी घेतल्या व त्यांच्या शौर्याच्या गाथा ऐकून या कार्यक्रमाचा समारोप केला.या संपूर्ण तीन दिवस या संपूर्ण तीन दिवसीय कार्यक्रमाला वर्धेतील शाळा , महाविद्यालये, व विविध संस्थांच्या वतीने दान व सहकार्य प्राप्त झाले होते. ज्यामध्ये वर्धेचे राज्यमंत्री डॉ पंकज भोयर, आमदार राजेश बकाने यांच्या माध्यमातून सहकार्य लाभले. तसेच दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, निव टेक व आयटी पार्क वर्धा यांच्या माध्यमातूनही सहकार्य लाभले. ज्यांच्या सहकार्याने हा संपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला या संपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता सर्वांची मदत मिळाल्याने वर्धा युथ फेस्टिवल कमेटी च्या संपूर्ण युवकांच्या वतीने आपण या दानदात्यांचे आभार व्यक्त करतो असे वर्धा युथ फेस्टिवलचे अध्यक्ष सारंग रघाटाटे यांनी सांगितले.या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन वर्धा येथे फेस्टिवल कमिटीच्या माध्यमातून करण्यात आले होते ज्यामध्ये सदस्य स्वरूप वर्धेतील सामाजिक संस्थांचा विशेष सहभाग लाभला ज्यामध्ये युथ पीस फाउंडेशन, सानिध्य फाउंडेशन, वर्धा विभाग मोहीम, वर्धा क्रिएटर्स असोसिएशन, जगदंब युवा पथक, मा प्रोडक्शन, युथ फॉर डेव्हलपमेंट फोरम, महा रोलर स्केटिंग क्लब, ब्ल्यू स्पोर्ट अकॅडमी वर्धा, यासारख्या नामवंत व युवकांसाठी निरंतर कार्य करत राहणाऱ्या सामाजिक संस्थांचा समावेश होता. या संपूर्ण कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील सुमारे २०० युवकांनी स्वयंसेवक म्हणून रहिवासी नामांकन केले होते. ज्याकरिता वर्धा युथ फेस्टिवल चे अध्यक्ष यांनी संपूर्ण स्वयंसेवकांचे विशेष आभार मानले.


