छत्रपती संभाजीनगर शहर प्रतिनिधी कृष्णा सोलाट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘तिसाई’ मासेमारी नौकेचे मालक हेमदीप टिपरी यांना ₹18.55 लाख नुकसान भरपाईचा धनादेश प्रदान करण्यात आला. मुंबई समुद्रात चीनच्या मालवाहतूक जहाजाने नौकेला धडक दिल्याने मोठे नुकसान झाले होते. चीन येथील कंपनीने नुकसान भरपाई देण्यास मान्यता दिली होती आणि आज ती रक्कम वितरित करण्यात आली.
या कार्यक्रमाला मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री नितेश राणे, मंत्रिमंडळातील सदस्य, मत्स्य व्यवसाय विभागाचे सचिव तथा वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.


