✍🏻 पियूष गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी ✍🏻
भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालय एटापल्ली येथील दिनांक ११ जानेवारी २०२५ पासून सुरू एकरा बु. येथे सुरु असलेल्या विशेष श्रमसंस्कार शिबिरात आरोग्य तपासणी शिबीर ( Anemia, Hb, KFT, LFT) घेण्यात आले. यावेळी प्रा. स्वास्थ्य केंद्र तोडसा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. लांडगे साहेब, डाॅ. लाड मॅडम यांनी विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक मार्गदर्शन केले. तसेच परिचारिका सौ. संगीता झुरे,सौ. गोलकोंडावार, आशा वर्कर सौ. शिला बडा, व श्री येनगंटीवार यांनी विद्यार्थ्यांची रक्त तपासणी केली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डाॅ. बाळकृष्ण कोंगरे होते तसेच प्रमुख अतिथी म्हणून रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ. संदिप मैंद, प्रा., डॉ. राजीव डांगे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा चिन्ना पुंगाटी, प्रा. अतुल बारसागडे तथा बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सहायक कार्यक्रम अधिकारी डाॅ. श्रृती गुब्बावार यांनी केले तर आभार प्रदर्शन पियुष गोंगले याने केले.


