यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी:- कैलास कोडापे
राळेगाव तालुक्यातील करंजी सोनामाता येथे दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी मानवतेचे महान पुजारी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व सर्व संत श्रुती सोहळा आयोजित करण्यात आला होता,या कार्यक्रमाची सुरुवात मानणीय प्रां.डॉ.अशोकरावजी ऊईके सर राळेगाव विधानसभा आदीवासी विकास मंञी महाराष्ट्र राज्य यांच्या विकास निधीतून मीळालेल्या मानवता मंदिराचा वास्तु पुजन करून व नंतर पोलीस पाटील संध्याताई निलेश वाभीटकर यांनी वुक्षा रोपन करून पुण्यतिथी सोहळ्याला सुरुवात केली सामुदायिक ध्यान प्रार्थना करण्यात आली दि.14 जानेवारी ला पवनपाल महाराज वडळीकर यांचे जाहीर कीर्तन करण्यात आल दिनांक 15जानेवारी ला महीलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या मध्ये पर्यावरण पुरक वान वाटण्यात आले.व या वेळेस वसंतराव खंडाळकर यांचा सस्कार करण्यात आले संध्याकाळी पंढरीनाथ ठाकरे महाराजयांचे ग्रामगीतेवर प्रबोधन झाले दी. 16 जानेवारी ला दिंडी , दहीहंडी , भंजन, कीर्तनाने व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या कार्यक्रमाला उपस्तित डॉ.ज्ञानेश्वर मुडे, फटीग.दादा, अंबादास लालसरे ,हांडे दादा, कीशोर काडुरवार, शेरली बापु लालानी संध्या वाभीटकर पोलीस पाटील रानवड पोलिस पाटील झाडे दिपाताई काडुरवार दिक्षाताई ठाकरे व समस्त गावकरी उपस्तित होतेया कार्यक्रमाचे आयोजन गुरुदेव सेवा भजन मंडळ करंजी सोनामाता यांनी केले होते.


