यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी :-कैलास कोडापे
- यवतमाळ येथे दिनांक १९-१-२५ रोज रविवारला सकाळी ११ वाजता ज्योतीबा दिनबंधु कल्याण मंडळ यवतमाळ र्.न.- एफ – १००५४ व्दारा आयोजित यवतमाळ येथे कोल्हे सभागृह दारव्हा रोड यवतमाळ येथे सर्व शाखीय माळी समाज उपवर युवक -युवती परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी विवाहेच्छुक मंडळांची ‘मंगलम २०२५ ‘ची परिचय पुस्तिका प्रकाशित करण्यात येईल.
या परिचय पुस्तिकेमध्ये यवतमाळ जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतील अनेक उपवर युवक- युवतींना आपली नोंदणी केली असून जाहिरातदार व वर्गणीदारांनी सहकार्य केले आहे.प्रकाशित होण्याऱ्या मंगलमय २०२५ या परिचय पुस्तिकेच्या प्रकाशन सोहळ्यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष अँड.अरुन मेत्रे हे असुन प्रमुख पाहुणे डॉ.विजय कानडे वाशिम हे राहणार आहे . तसेच या कार्यक्रमाला आमदार चंदुभाऊ यावलकर मोर्शी तथा बियाणे महामंडळ, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष प्रमोद कोरडे परतवाडा हे राहणार आहे.
क्रांतीसुर्य माळी मुवा मंडळाचे अध्यक्ष महेंद्र पिसे,सावेत्रीबाई फुले महिला कल्याण मंडळाच्या अध्यक्षा सौ.सविता कावलकर याही उपस्थित राहणार आहे . तसेच यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाखीय माळी समाजातील मान्यवर व स्थानिक स्तरावरील सर्व शाखेचे व संघटनेचे प्रमुख मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित राहणार असुन मेळाव्याचे मुख्य संयोजक इंजि.शशांक केंढे व आयोजक यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाखीय माळी समाज उपवर युवक -युवती व माळी समाजातील बंधुभगिनीं मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ज्योतीबा दिनबंधु कल्याण मंडळातर्फे मंडळाचे प्रसिद्धीप्रमुख अतुलक
कुमार सारडे यांनी केले आहे .


