बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी :-सुनिल वर्मा
मेहकर- नगरीचे आराध्य दैवत भगवान शारंगधर बालाजी यांचा १३६ वा प्रगट दिन महोत्सव शुक्रवार ६ ते १७ डिसेंबर मंगळवार पर्यंत मोठ्या उत्साहाने व धार्मिक वातावरणात संपन्न झाला. या कालावधीमध्ये शारंगधर बालाजी मूर्तीला वेगवेगळ्या देवता व देवी यांच्या नयन मनोहर पोशाखात सजविण्यात आले होते.भगवंताचे या पोशाखामधील शारंगधरचे दर्शन घेण्याकरता जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यभरातून भाविक भक्त शारंगधर नगरी मेहकर येथे आले होते.आज माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या हस्ते महाप्रसाद वितरणाचा शुभारंभ करून वितरण करण्यात आले.
सकाळी शारंगधर बालाजी भगवान यांच्या नयन मनोहर मूर्तीला विधिवत मंत्रोपचारामध्ये पूजा पाठ करून वैदिक मंत्रांद्वारे अभिषेक होऊन आरती करण्यात आली. पूर्ण मंदिराला प्रदक्षिणा घालण्यात आली. यावेळी जय जय गोविंद जय हरी गोविंद याचा जयघोष करण्यात आला. ११क्वि. मोतीचूर लाडू तसेच २१क्विंटल वांग्याची भाजी व २१क्विंटल गव्हाच्या पोळ्या असा महाप्रसाद बनविण्यात आला होता. मागील दोन दिवसापासून महाप्रसाद बनवण्याचे कार्य मंदिर परिसरामध्ये सुरू होते.आज दुपारी माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या हस्ते महाप्रसाद वितरणाचा शुभारंभ करण्यात आला.भाविकांसाठी पाण्याच्या बाटल्यांची व्यवस्था महाराष्ट्र अर्बनचे संचालक अजय उमाळकर ,स्वप्निल घोडे, व मानधना यांच्या वतीने करण्यात आली. बालाजी उत्सव अन्नदान सेवा समिती च्या सर्व सदस्यांनी आपले अमूल्य योगदान दिले. यावेळी उत्सव समितीचे राजीव जैस्वाल , उदय सोनी, सखाराम लाहोटी, मनोज सावजी, सुरेश तिवारी, आशिष उमाळकर, प्रशांत सावजी, वासुदेव वराडे, सुनील मुंदडा, गिरीश रूपडा, पुरुषोत्तम शर्मा, सुरेश मुंदडा यांनी महाप्रसादाचे नियोजनबद्ध वितरणासाठी परिश्रम घेतले. शारंगधर बालाजी संस्थांनचे अध्यक्ष ॲड. संजय सदावर्ते सचिव दीपक पांडे, विश्वस्त डॉ. विनय सावजी , उमेश मुंदडा, डॉ. नंदकुमार उमाळकर, ऍड .हेमंत देशमुख, गोपाल अग्रवाल, अभय सावजी, विजय भिते, व्यवस्थापक हनुमंत देशमुख याप्रसंगी प्रसंगी उपस्थित होते. गजानन देशमुख, पंकज बोरकर, विनायक बदामे, गोपाल जाधव यांनी अथक परिश्रम घेतले. भविक भक्त महाप्रसाद सेवन करीत असतांना ‘श्री शारंगधर भजनी मंडळाद्वारे’ नादब्रम्हाच्या सात्विक आनंदाची बरसात चालू होती. अनिल इंगळे, पुरुषोत्तम शीलवंत या कलाकारांसह ज्ञानदेव हरणे, अशोक अडेलकर, प्रा. रमेश आखरे, प्रा. किशोर क्षीरसागर श्रीराम झनक, किशोर मैंद, संदीप सावळकर, गजानन अवचार या भजन मंडळ सदस्यांनी संगीताच्या सरींची बरसात करून सर्वांना मुग्ध केले.


