सातारा विभाग:- निलेश कोकणे (माण तालुका प्रतिनीधी)
श्री संत शिरोमणी नामदेव महाराज समाजोन्नती परिषद जिल्हा कार्यकारिणीची पहिली सभा सातारा येथे आज दिनांक 16 डिसेंबर रोजी ना. स. प. चे. अध्यक्ष श्री संजयजी नेवासकर व सातारा जिल्हा ना स प चे अध्यक्ष इंजिनिअर श्री सुनिलजी पोरे साहेब यांच्या उपस्थितीत पार पडली.श्री संत नामदेव महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण. पसायदान म्हणून. सभेला सुरुवात करण्यात आली. संपूर्ण जिल्ह्यातील निमंत्रित समाज बांधव उपस्थित राहिले. ना स प ची पुढील दिशा ध्येय उद्धीष्ट समजपयोगी कार्याची निश्चिती कशी करायची याची माहिती ना स प चे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष श्री संजयजी नेवासकर यांनी सर्वांना दिली. ना स प चे नूतन जिल्हा अध्यक्ष इंजिनिअर श्री सुनिलजी पोरे साहेब यांनी नामदेव शिंपी समाज विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माण खटाव मतदार संघांचे जलनायक आमदार कॅॅबिनेट मंत्रिपद मिळालेले श्री जयकुमारजी गोरे भाऊ यांच्याकडे केलेला सातत्याने पाठपुरावा या गोष्टींना यश प्राप्ती मिळाली आहे. या महामंडळाच्या स्थापनेमुळे सर्व समाज बांधवाना आणि भगिनींना होणारे लाभ याची सविस्तर रूपरेषा सर्व उपस्थितांना सांगण्यात आली.श्री सुनिलजी पोरे साहेब यांनी सर्व नवनिर्वाचित ना स प च्या कार्यकारिणीत नूतन पदाधीकारी सदस्य यांना शाल श्रीफळ श्री संत नामदेव महाराजांचे प्रतिमा असलेले सन्मान चिन्ह आणि नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. प्रत्येक समाज बांधवानी एक दिलाने निःस्वार्थ भावनेने समाजकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. आपला समाज एकसंघ रहावा. प्रत्येक समाज बांधव हा एक या ना स प चा एक घटक कसा निर्माण होईल. नवीन पिढी कशी तयार करता येईल. आपले समाजाप्रती असणारे शुभ संदेश. एक नवीन प्रेरणादायी विचार कसे प्रत्येक समाज बांधवांच्या पर्यंत पोहचविता येतील याची बांधणी करण्यात आली. सर्व उपस्थितीतांनी आपले मनोगत व्यक्त केले. या मध्ये जेष्ठ सदस्यांचे मार्गदर्शन खूप मोलाचे ठरले. ना स प चे जिल्हा अध्यक्ष श्री सुनिलजी पोरे साहेब यांनी सर्व उपस्थित समाज बांधवांचे आभार मानले व पुढील वाटचालीस सर्वांना शुभेच्छा दिल्या…


