गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी :- आशिष लाकडे
देशात मोठ्या प्रमाणात अपंग , निराधार व निराश्रीत लोक आहेत . ते दुसऱ्यांच्या सहकार्याशिवाय जगू शकत नाही . अशा लोकांना शासनामार्फत धान्य पुरवठा , संजय गांधी निराधार योजना , श्रावणबाळ योजना , वृद्धापकाळ निवृती वेतन अशा विविध योजना मिळतात . अन्नधान्य मिळविण्यासाठी हे लोक धान्य दुकानापर्यंत जाऊ शकत नाही . अन्नधान्य लाभार्थ्यांना त्यांच्या घरपोच मिळावे अशी योजना शासनाने करावे . तसेच विविध योजनांद्वारे मिळणारा पैसा त्यांच्या बॅक खात्यात जमा होण्यापेक्षा त्यांच्या घरी प्रत्यक्ष हातात मिळावे अशी योजना निर्माण करावे .
अपंग व निराधार लाभार्थी घरा बाहेर जाऊ शकत नसल्याने अन्नधान्य व पैसा मध्यस्थी किंवा दलाली देऊन उचल करतात . त्याचा मोबदला त्यांना द्यावा लागतो . तसेच जास्त काळ पैसा बॅकेतून उचल न झाल्यास बॅक तो पैसा गोठवून टाकते . त्यामुळे अपंग व निराधारांची उपासमार होते . यांवर शासनाने योग्य योजना निर्माण करावे .
निवेदन देतेवेळी भोजराज कान्हेकर बामसेफ जिल्हाध्यक्ष , मुनिश्वर बोरकर आरपिआय जिल्हाध्यक्ष , प्रमोद राऊत प्रभारी राष्ट्रीय किसान मोर्चा , गोपाल रायपूरे आरपीआय जिल्हाध्यक्ष चंद्रपूर , खेमचंद हस्ते , जैराम उंदिरवाडे , दशरथ साखरे , चोखोबा ढवळे , लवकुश भैसारे , जयंत गेडाम , उमेश ढोक , सुहाशिनी मेश्राम , प्रेमलता कान्हेकर , मिना मेश्राम उपस्थित होते…


