वर्धा जिल्हा प्रतिनिधी:- मयूर कोल्हे
वर्धा शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई
वर्धा:- पोलीस हवालदार प्रशांत वंजारी पोलीस स्टेशन वर्धा शहर यांना पोलीस स्टॉपसह पोस्टे हजर असताना खबरी(गुप्त माहितीदार) कडून मिळालेल्या माहिती नुसार एक इसम कमी पैशात मोटरसायकल विकण्याकरता सेवाग्राम रेल्वे स्टेशन परिसरात फिरत आहे अशा माहितीवरून पोलिसांनी सापळा रचला व तसेच त्याला ताब्यात घेऊन त्याचे नाव व पत्ता विचारला असता, त्याने त्याचे नाव अनुराग प्रवीण धाबर्डे वय 19 वर्ष राहणार तळोदी तहसील सेलू जिल्हा वर्धा असे सांगितले.
त्याला सदर मोटरसायकल बाबत अधिक विचारपूस केली असता त्याने सदरची मोटर सायकल ही चार ते पाच दिवसांपूर्वी बजाज चौक भाजी मंडई( मार्केट) मधून चोरी केल्याचे सांगितले.
त्यावरून पोलीस स्टेशन मधील मागील दाखल केसेस तपासले असता ही मोटरसायकल रामकृष्ण पोहनकर यांच्या मालकीची असून त्यांचे तक्रारीवरून मोटरसायकल बाबतचा गुन्हा पोलीस स्टेशन वर्धा शहर ला नोंद आहे
आरोपी अनुराग धाबरडे कडून एक हिरो होंडा स्प्लेंडर क्रमांक MH 32 R. 5829 कि.20,000 रुपयाचा माल मुद्दा जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई हि माननीय पोलीस अधीक्षक अनुराग जैन साहेब, अपर पोलीस अधीक्षक सागर कवडे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा विभाग प्रमोद मकेश्वर साहेब यांच्या निर्देशाप्रमाणे मा.पोलीस निरीक्षक पराग पोटे ठाणेदार पोलीस स्टेशन वर्धा शहर यांचे मार्गदर्शनात पोउनि शरद गायकवाड साहेब, गुन्हे प्रगटीकरणाचे पथकाचे पोलीस हवालदार प्रशांत वंजारी, पोलीस नाईक नरेंद्र कांबळे, पोलीस शिपाई वैभव जाधव, श्रावण पवार, सर्व पोलीस स्टेशन वर्धा शहर यांनी केली.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार प्रशांत वंजारी पोलीस स्टेशन वर्धा शहर हे करीत आहे.
तसेच आरोपी ने अन्य काही ठिकाणी मोटारसायकल चोरी व अन्य काही गुन्हे केले आहेत का? याचा सुद्धा पोलीस तपास करत आहेत.


