यवतमाळ जिल्हा विभाग
वणी :-सभेची सुरुवात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. संचालन अॅड. अमोल बोरुले यांनी केले. कार्यक्रमाची प्रस्तावना प्रवीण निकोडे, प्रमोद निकुरे, भास्कर वाढई आणि
मनीषा ठाकरे यांनी मांडली. यावेळी अध्यक्षपदी रिंकू मोहरले यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी प्रीती गुरनुले, शोभा मोहरले, संगीता वाढई, सचिव रेखा रासेकर, सहसचिव ज़या सोनुले, कार्याध्यक्ष रूपा कुरेकर, कोषाध्यक्ष नंदा शेंडे, संघटकपदी विद्या मांदाडे यांची निवड केली. सदस्यांमध्ये शकुंतला शेंडे, रीमा सोनुले, किरण ढोले, संगीता निकोडे, रेखा शेंडे, मनीषा ठाकरे, वर्षा वाढई, ज्योत्स्ना वाढई, उषा लेंगुळे, माधुरी चौधरी, दीपा मांदाडे, निर्मला चौधरी, दीपा मांदाडे, दीपा गुरनुले यांचा समावेश आहे. यावेळी माळी समाजबांधव उपस्थित होते.


