अकोला विभाग प्रतिनीधी: – गणेश वाडेकर
मूर्तिजापूर तालुक्यातील ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीतील एका गावात उच्च शिक्षित २२ वर्षीय तरुणीचा मोबाइल किंवा प्रत्यक्ष भेटून वारंवार त्रास देणाऱ्या त्याच *गावातील २७ वर्षीय नांदुरकर नामक युवकाविरुद्ध फिर्याद* दाखल केल्यावरून गुन्हा नोंदविण्यात आला होता. मात्र आरोपीहा घटनेच्या दिवसापासून फरार झाल्याने त्याला गजाआड करण्यासाठी पोलिसांनी सापळा रचून नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथे दडून असलेल्या आरोपीला अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता, त्याला ३० डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.


