अकोला विभाग् प्रतिनिधी: -गणेश वाडेकर
रामदासपेठ पोलिस स्टेशन हद्दीतील जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरात विशाल बिल्डिंग शासकीय निवासस्थानात फिर्यादी विष्णू किसनराव पडगव्हाण रहिवासी आहेत. ते जिल्हाधिकारी कार्यालयात शिपाई पदावर कार्यरत असून, *शिवदास हरिदास ठोंबे यांच्या विरुध्द फसवणुकीसंदर्भात* जिल्हाधिकारी तथा विभागीय आयुक्त अमरावती यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यावर येत्या १९ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे ती तक्रार मागे घेण्यासाठी ठोंबे याने फिर्यादीच्या घरी येऊन जीवे मारण्याची धमकी दिली.


