यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी गणेश राठोड
डिजिटल इंडिया चा खरा दुवा म्हणजे ग्रामपंचायत मधे काम करणारा संगणक परिचालक आहे. गाव खेड्यात ग्रामस्थांना सर्व सुविधा पुरवणारा,ग्रामपंचायतचे ऑनलाईन सर्व काम करणारा महत्वाचा घटक म्हणजे संगणक परिचालक आहे. मागील तेरा वर्षापासून खूप कमी मानधना वर काम करणारा हा शिक्षित तरुण स्वतःच्या न्याय हक्का साठी नेहमी झगडत आहे. कधी नागपूर ठिकाणी आंदोलन तर कधी मुंबई ठिकाणी तर कधी जिल्हा कार्यालय तालुका कार्यालय ठिकाणी विविध आंदोलन संगणक कर्मचारी संघटनेने केलेले आहेत. येणाऱ्या काळात संगणक परिचालक यांचे सर्व मागण्या मान्य करून घेण्या साठी पुन्हा नव्याने जोमाने कामाला लागण्या साठी जिल्हाध्यक्ष बीड पूर्व पदी विजय दराडे यांची निवड करून त्यांना सह राज्य कार्याध्यक्ष पदी सुद्धा त्यांची निवड करण्यात आली आहे. राज्य अध्यक्ष गुणवंत राठोड राज्य उपाध्यक्ष विजय धायजे राज्य सचिव जितेंद्र साखरे राज्य सहसचिव सतिश सद्दार राज्य कार्याध्यक्ष संदीप दत्तात्रय हूड यांच्या निवडी करण्यात आल्या असून लवकरच तालुका अध्यक्ष निवडी होणार असल्याचं समजले.


