विदर्भ विभाग प्रमुख:- युसूफ पठाण
यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई द्वारे 7 व 8 जून 2025 रोजी पुणे लोणावळा येथे आयोजित केलेल्या जिल्हा समन्वयक समितीच्या कार्यशाळे मध्ये “आरोग्य” वर्धा जिल्हा समन्वयक म्हणून नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई द्वारे आरोग्य,दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक विषयक समाज जागृती व अंमलबजावणी असे विविध कार्यक्रम व उपक्रम राबविले जातात.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांच्या गौरवशाली कार्याचा व विचारांचा प्रचार,प्रसार व अंगीकार व्हावा यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई द्वारे काम केले जाते.या सेंटरचे ब्रीदवाक्य आहे “विश्वासार्ह सर्वोत्तम सेवा “
या सेंटरचे अध्यक्ष माननीय शरदचंद्र पवार साहेब तसेच कार्याध्यक्ष असलेल्या माननीय खा. सुप्रियाताई सुळे यांचे मार्गदर्शन व दत्ताभाऊ सराफ,विजय कान्हेकर,अभिजीत राऊत,दिपिका शेरखाने,गौरव जाधव,गजानन साबळे,मनीषा जाधव यांच्यासोबतच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये आरोग्य,दिव्यांग व जेष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यां सोबत काम करण्याची संधी प्रवीण पेठे यांना भेटणार आहे.
https://chat.whatsapp.com/FlTG1QxvCOFDzH3OQrUlIr
जवान प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून युवक युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे,रक्तदान चळवळ,बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे अश्या अनेक सामाजिक उपक्रमा मध्ये प्रवीण पेठे यांचा सहभाग असतो.त्यांच्या या नियुक्ती बद्दल समाजाच्या विविध घटकांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.

