विदर्भ विभाग प्रमुख:- युसूफ पठाण
स्थानिक युवा सोशल फोरम अध्यक्ष सुधीर पांगुळ हे नेहमीच सामाजिक धार्मिक कामांमध्ये तत्पर असतात आषाढी एकादशीचे अवचित्त साधून गजानन महाराज देवस्थान बरबडी येथून निघालेली आहे वारकरी, भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला ‘देवशयनी आषाढी एकादशी’ असे म्हणतात. आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्त्व आहे.
संत नामदेवांनी आपल्या अभंगात म्हटल्याप्रमाणे आधी रचिली पंढरी, नंतर वैकुंठ नगरी असा उल्लेखही आढळतो दर आषाढी एकदशीला वारकरी संप्रदाय वारी घेऊन पंढरपुरात जातात आणि ही पंरपरा आठशे वर्षांपेक्षाही अधिक काळापासून सुरू असल्याचे सांगण्यात येते.
पायावर डोके ठेवल्याने लाभ होतो असा समज होता त्यामुळे आजही आपल्याकडे थोरामोठ्यांच्या पाया पडण्याची परंपरा कायम आहे आणि पुढीला पिढीला योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी आषाढी एकादशी या दिवसाला महत्त्व प्राप्त झाल्याचे सांगण्यात येते.

या वेळेस युवा सोशल फोरम चे सभासद विवेक तळवेकर बादल शेळके सचिन हजारे सुदर्शन उगले सतीश लांबट प्रशांत बहाद्दुरे मयूर देशमुख संदीप गणोरे श्रीकांत ढगे अभिजीत चौधरी विशाल हजारे पंकज इंगोले उपस्थित होते

