प्रतिनिधी सगीर शेख खर्डी
मुंब्रा स्थानकाजवळ ट्रेनच्या दरवाजात उभे राहून प्रवास करत असताना शेजारुन जाणाऱ्या लोकलचा धक्का लागल्याने ८ जण खाली पडले. या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
बॅगेने घात केला?
मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ९ ते ९.३० च्या दरम्यान कसारा ते सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमधील प्रवासी फूटबोर्ड वरुन प्रवास करीत होते. या लोकलमध्ये मोठी गर्दी असते. त्यामुळे प्रवाशांना फूटबोर्ड वरून लटकून प्रवास करावा लागतो. यादरम्यान विरुद्ध दिशेने येणाऱ्या लोकलमध्ये आणि कसारा – सीएसएमटी लोकलमधील प्रवाशाची बॅग खेचली गेली. तो प्रवासी खाली कोसळला, यामुळे आजूबाजूला लटकलेले प्रवासी खेचले गेले.
त्यातून आठ प्रवासी पडल्याचं सांगितलं जात आहे. त्यातील एका प्रत्यक्षदर्शीने यासंदर्भातील माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार यातील पाच प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

