प्रतिनिधी सगीर शेख खर्डी
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते शहापूर तालुक्यातील आसनगाव कळंभे, खर्डी, चिखलगाव, मुगाव, डोळखांब, गांडूळवाढ,चोंढे, नडगाव येथील हजारो कार्यकर्त्यांनी शिवसेना नेते मा. श्री. प्रकाशजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाने जिल्हाप्रमुख मा. श्री. मारुती धिर्डे साहेब यांच्या नेतृत्वात शिवसेना तालुकाप्रमुख मा. श्री. प्रकाश वेखंडे साहेब यांच्या प्रयत्नातून उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
यामध्ये उबाठाचे संपर्कप्रमुख तथा माजी पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर तळपाडे सर, आसनगाव ग्रामपंचायत सरपंच रवीना कचरे, उपसरपंच राहुल चंदे, शहर प्रमुख बॉबी चंदे, उपशहर प्रमुख दीपक चंदे, उपतालुकाप्रमुख नितीन चंदे, उपतालुकाप्रमुख शिवाजी चंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर चंदे, माजी पंचायत समिती सभापती रेश्मा मेमाणे, महिला आघाडी शकुंतला लांघी, माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष चौधरी, माजी सरपंच संजय भांगरे, माजी ग्रामपंचायत सदस्य परमेश्वर मेमाणे, उबाठा शाखाप्रमुख दत्तात्रय गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य एकनाथ चंदे, ग्रामपंचायत सदस्य रोहित कांबळे, यांसह आसनगाव मधील 200 कार्यकर्ते, मुगाव ग्रामपंचायत चे उपसरपंच रमेश ढमके , रानवीर ग्रामपंचायत उपसरपंच मनोहर राऊत, चिखलगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच सतीश देसले, यांसह किनवली भागातील 50 कार्यकर्ते, उपतालुकाप्रमुख किशोर शेलवले, उपतालुकाप्रमुख विकास चौधरी यांच्यासोबत डोळखांब विभागातील विभाग प्रमुख मालू खोडका यांसह शेकडो कार्यकर्ते, खर्डी येथील उबाठा तालुका समन्वयक अनिल मडके, दिनेश सदगीर, शैलेश मयेकर यांसह 100 कार्यकर्ते, कळंबे बोराशेती ग्रामपंचायतचे धडाडीचे सदस्य तथा समाज कल्याण महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष स्वप्निल भोईर, ग्रामपंचायत सदस्य मोनल पहुरकर, ग्रामपंचायत सदस्य रश्मी जवरे यांच्यासह कळंबे परिसरातील दीडशे कार्यकर्ते, आगरी सेना तालुकाप्रमुख श्याम भाई कोरडे, उबाठा युवा सेना विनोद म्हसकर, नडगाव उबाठा शाखाप्रमुख अवधूत भालके, गोलभण ग्रामपंचायतचे उपसरपंच कांचन घरत, जिजाऊ चे शाखाप्रमुख किशोर घरत, खर्डी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच दिनकर सदगीर अशा एकूण शहापूर तालुक्यातील एक हजार कार्यकर्त्यांनी आज शनिवार दिनांक 7 जून 2025 रोजी ठाणे येथील मातोश्री गंगुबाई शिंदे बहुउद्देशीय सभागृह येथे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

