शिवराज्यभिषेक दिनाचे औचित्य गुणवंताचा सत्कार
राळेगाव प्रतिनिधी:-कविता धुर्वे
राळेगांव:-छत्रपती शिवाजी महाराज आपलं दैवत आहे आपल्या मुलांना महाराजांचा इतिहास वाचायला लावणे गरजेचे आहे त्यांच्यापासून स्फूर्ती मिळेल महाराजांचा इतिहास आम्हाला प्रेरणा देणारा आहे असे प्रतिपादन नव्यानेच राळेगाव पोलीस स्टेशनला रुजू झालेल्या पोलीस निरीक्षक शितल मालते यांनी केले .छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक दिन शिवतीर्थ येथे साजरा करण्यात आला याच दिवसाच्या औचित्य साधून तालुक्यातील दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष नगरपंचायतीचे नगराध्यक्ष रवींद्र शेराम तर प्रमुख उपस्थिती म्हणून पोलीस निरीक्षक शितल मालते,सौ.भावना खगन उपस्थित होत्या सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे विधिवत पूजन करण्यात आले
यानंतर विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी भावना खगन यांनी इतिहास हा विषय नुसता मार्च घेण्यासाठी नसावा तो परीक्षेपुरता नसावा ती आपल्या आयुष्याची शिदोरी म्हणून शिकत राहिले पाहिजे असे विचार व्यक्त केले मार्गदर्शन नगरपंचायतीचे नगराध्यक्ष रवींद्र शेराम यांनी केले प्रास्ताविक माजी प्राचार्य अशोक पिंपरे यांनी तर कार्यक्रमाचे संचालन शंकर मोहुले॔ यांनी केले आभार प्रदर्शन राजू रोहणकर यांनी केले पोलीस निरीक्षक शितल मालते या नव्यानेच राळेगाव पोलीस स्टेशनला रुजू झाल्याच्या निमित्ताने व त्या या पोलीस स्टेशनला पहिल्याच महिला पोलीस निरीक्षक असल्याने त्यांचा आयोजन समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये कुमारी देवता अनिल पुरी लोकविद्यालय कनिष्ठ महाविद्यालय खैरी वाणीज्य शाखा प्रथम प्रतिक्षा विलासराव खंडाळकर कला शाखा प्रथम लमवि व कनिष्ठ महाविद्यालय झाडगांव मेघना पृथ्वीराज गिरी विज्ञान शाखा प्रथम मार्कण्डेय पब्लीक स्कुल बरडगांव . कु आकांशा राजेश कोहाड १०वी प्रथम क्रमांक न्यु इंग्लीश हायस्कुल राळेगांव मोहित लक्ष्मण खेकारे व्दितीय न्यु.इंग्लीश हायस्कुल राळेगांव अथर्व मोहन भोरे तृतीय न्यु इंग्लीश हायस्कुल राळेगांव या गुणवंताचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला माजी प्राचार्य अशोक पिंपरे, माजी प्राचार्य सुरेंद्र ताठे, भारत ठुणे, नितीन कोमेरवार, नगरसेवक मंगेश राऊत, ॲड मंगेश बोबडे, ॲड अल्पेश देशमुख, शंकर मोहुर्ले, राहूल बहाळे, संजय दुरबुडे, योगेश इंगोले, महेंद्र फुलमाळी, सैय्यद लियाकत अली, प्रविण काकडे, नितीन कोरडे, नगरसेवक मधुकर राजूरकर, शुभम चिडाम, लोकेश गायकवाड, चेतन बेंबारे, सचिन कोठुरकर, भूपेंद्र चांदेकर, देवराव नाखले, मंगेश पिंपरे, भटकर सर, रुपेश कोठारे, महादेव ससाणे, सार्थक बहाळे ,दिक्षा नगराळे, सौ वैशाली रोहणकर, सौ भावना बहाळे यांची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समितीच्या सर्वच सदस्यानी परीश्रम केले .

