महाराष्ट्र अनिसच्या पुढाकाराने प्रेमविरांचे मनोमिलन…. पुढील अनर्थ टळला
वर्धा लेखनीय विभाग:- गजेंद्र सुरकर
प्रेम करने हा निसर्ग नियम आहे ते मित्रात असते आई मुलात,भाऊ बहिणीत परंतु तरूण तरुणी एकमेकांवर जिवापाड प्रेम करतात या प्रेमाला घरून, समाजाकडून कडवा विरोध होतो यामुळे अनेक जोडपे आता आपण एकत्र राहू शकत असे मनात आणून आत्महत्या करतात अनेकदा मुलीवर अतिप्रसंग होतो तर अनेकदा ऑनरकिलींगच्या घटना घडतात मात्र या प्रेमाला उपमा नाही त्यामुळे प्रेमावर सिनेमा नाटक गाणी कविता,शायरी असे कितेक साहित्य निर्माण झाले मात्र तेवढाच विरोध दिवसेंदिवस वाढतच आहे अशाच घरून पळून आलेल्या अल्पवयीन रितेश विलास वानखेडे व वृषाली गजानन आंभोरे यांचे अनेक अडचणींवर मात करून त्यांचे व दोन्ही कुटूबाचे मनोमिलन घडणूक आणून पुढील होणारा अनर्थ शुक्रवारी सखी वन स्टॉप सेंटरच्या केन्द्राच्या प्रशासक रेश्मा रघाटाटे यांच्या सहकार्याने टाळल्या गेला.

वृषाली हि २४ वर्षाची तरुणी ठाणे येथे राहणारी तर रितेश हा वाशिम जिल्ह्यातील राहणारा वृशाली स्थिरस्थावर कुटुंबातील तर रितेश वय २० वर्षाचा अल्पवयीन मुलगा गरीब कुटुंबातील वडिल नसलेला कामानिमित्ताने गोरेगाव येथे मामाच्या मदतीने कामाला लागला तिथेच वृषाली सोबत ओळख झाली मित्रता वाढली भेटी गाठी वाढल्या निसर्ग नियमाप्रमाणे शरीर आकर्षण निर्माण होवून एकमेकांविषयी प्रेम वाढले सोबत एकत्र राहण्याच्या आणाभाका घेतल्या पण मुलाचे वय, शिक्षण,गरीबी हि समस्या निर्माण झाली वृषालीच्या कुटूंबाकडून विरोध होऊ लागला दोघांनीही पळून जावून लग्न करून एकत्रित राहण्याचा निर्णय घेतला व १२ नोव्हेंबरला पळ काढला इकडेतिकडे काही दिवस फिरले पण समाजातील वास्तव समोर आले इज्जत आबरू सुरक्षित नाही याची जाणीव झाली सुरक्षित स्थळी शोधतांना ओळखिच्या रवि नागपुरे याची आठवण झाली त्याला संपर्क करून आपबिती, समस्या सांगितली त्याने त्याच्या ओळखीच्या व बहीण मानलेल्या सादिया पठाण या मुस्लिम महिलेला कळविले दोघांनीही मदत करण्याचे ठरवून त्यांना बोलावून आश्रय दिला तिकडे दि १३ नोव्हेंबरला मुलीच्या आईवडिलांनी दिंडोरी पोलिस ठाण्यात जिल्हा ठाणे येथे मुलगी पळवून नेल्याची तक्रार नोंदवली लगेच पोलीस सक्रिय झाले यांनी आपले सिम कार्ड काढून फोन बंद केला त्यामुळे पोलिसांना ठावठिकाणा लागत नव्हता पण कानून के हात लंबे होते है या म्हणी नुसार यांना आश्रय देणा-या रवि नागपुरे यांना धमकावले दोघांनाही पोलिस स्टेशनमध्ये हाजीर करा किंवा त्याचा पत्ता द्या अन्यथा अटक करु त्यांनी सादिया पठाण यांचा पत्ता देवून त्यांचा ठिकाणा सांगितला पोलीसांनी सादिया पठाण ला पण तशीच धमकी देऊन धमकी देताच अशे लग्न लावून देणारे व समुपदेशन करणारे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार यांना फोन करून रितेश व वृषाली यांना हजर केले त्यांनी सर्व कागदपत्रे तपासून त्यांचे समुपदेशन केले लग्न केल्यास कायदेशीर कार्यवाही होईल कारण मुलगा अल्पवयीन आहे याबाबत माहिती दिली तरी मदत करण्याचा शब्द दिला कारण अशा वेळी मुलं मुली आत्महत्या करतात किवा समाजातील समाजकंटक मुलीच्या शरीराचा उपभोग घेण्यास तयारच असतात हे माहीत असल्यामुळे सहकार्य करण्याचे ठरवून पोलिस कारवाई टाळण्यासाठी मुलीला सुरक्षित स्थळी ठेवण्यासाठी केन्द्र सरकार पुरस्कृत महिला व बाल कल्याण विभागाच्या अन्तर्गत काम करणा-या व अडचणीत सापडलेल्या महिला मुलींना कायदेशीर आश्रय देणा-या सखी वन स्टॉपच्या प्रशासक रेश्मा रघाटाटे यांना मदत मागितली त्यांनी लगेच मुलीला सेंटरला आणण्यासाठी सांगितले लगेच सर्व कायदेशीर कागदपत्रे पडताळून वृषालीला सुरक्षा दिली व पोलिसांना कळविले दि २९ नोव्हेंबरला पोलिस कर्मचारी भुषण महाजन यांच्या सह मुलीचे वडील गजानन माणिक आंभोरे व आई सखी वन स्टॉप वर्धा येथील सेन्टरवर हजर होऊन सर्व कायदेशीर कारवाई पूर्ण करून वृषालीला घेऊन जाण्यास तयार झाले दुसरे दिवशी दोन्ही कुटूंब एकत्रित आले दोघांचेही समुपदेशन गजेंद्र सुरकार व रेश्मा रघाटाटे यांनी केले त्याला प्रतिसाद देत मुलाचे लग्नाचे वय २१ झाल्याबरोबर करण्याचे ठरविले मुलीला रितेश च्या आईने मंदा विलास वानखेडे यांनी सर्वांसमोर स्विकारण्याचे वचन दिले मुलीच्या वडिलांनी व आईनेही लग्न लावून देण्याचा शब्द सर्वांसमोर दिला व दोन्ही कुटूबाचे मनोमिलन होऊन पुढील अनर्थ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हा व शहर शाखा वर्धा यांच्या पुढाकाराने खेळीमेळीच्या वातावरणात टळला दोघांनीही लग्न होईपर्यंत कायदेशीर करार करून लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहण्याचे दोन्ही कुटूंब यांच्या सहमतीने ठरविले
या साठी सेन्टरच्या आय.टी.स्टाॅपचे प्रमुख शेषराव राठोड, परिचारिका शुभांगी दुपारे, सुरक्षारक्षक आशिष भरणे,दोन्ही कुटूंबातील किसन दांडगे, सुमित बोंदोडे, अमोल पाले यांनी सहकार्य केले.



