अकोला जिल्हा प्रतिनिधी:- गणेश वाडेकर
लग्न समारंभातून अत्यंत शिताफीने दागिने लंपास करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना यश आले आहे. हॉटेल तुषारमधील लग्नात दागिन्यांवर हात साफ करणाऱ्या मध्य प्रदेशातील राजगड येथील कुख्यात सांसी गँगच्या दोन सदस्यांना अटक करून त्यांच्या ताब्यातून साडेआठ लक्ष रुपयांचे दागिने जप्त करण्याची धाडसी कारवाई ‘एलसीबी’च्या पथकाने केली. हॉटेल तुषारमध्ये २५ नोव्हेंबर रोजी नागपूर येथील पीयूषकुमार बाबुराव वाघमारे यांच्या लहान भावाचे लग्न होते. त्या लग्नातून दागिने लंपास करण्यात आले होते.



