अकोला विभाग प्रतिनीधी:- गणेश वाडेकर
मूर्तिजापूर: – गोपालसिंग प्रतापसिंग राठोड वय ८० वर्ष राहणार शिवाजीनगर सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी रविवार १ डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता परिवाराला घेऊन हेंडज राधास्वामी व्यास सत्संग करीता घराला कुलूप लावून गेले असता परत आल्यानंतर त्यांना दरवाज्याचे कुलूप तुटलेले दिसले त्यांनी घरात प्रवेश केला तर कपाटा मधील सोन्याचे बिस्किट व पाच आंगठ्या जुन्या किमतीनुसार अंदाजे किंमत १ लाख २० हजार तसेच रोख रक्कम ३० हजार रुपयाचा अज्ञात भामट्यांनी चोरून नेला.



