वर्धा प्रतिनीधी: – आर्वी विभाग

रविवार दि 01/12/2024 रोजी
आर्वी, तळेगाव येथे
सुंदरकांड,श्री हनुमान आरती व महाप्रसाद चे आयोजन महाराज श्री. महादेवरावजी दळवी व सौ राधिकाताई विष्णुप्रसाद भारती यांनी केले होते.
सुंदरकांड व महाप्रसादाचा कार्यक्रम बाहुबली श्री हनुमान मंदिर तळेगाव, आर्वी आयोजित कार्यक्रम संपन्न .
महाराज श्री महादेवरावजी दळवी यांच्या सुमधुर वानींतुन श्री सुंदरकांड व श्री हनुमान आरतीचा लाभ भक्तांना मिळाला. महाराजांनी सुंदरकांड व श्री हनुमान जी यांच्या भक्ती कार्याचे महत्व भक्तांना आपल्या वाणीतून सांगितले.
मोठ्या संख्येनी भक्त मंडळी यात महिला, पुरुष,जेष्ठ नागरिक युवा वर्ग उपस्थितीती होती.
सुंदरकांड व आरती नंतर
सर्वं भक्तांनी श्री हनुमान जी यांच्या महाप्रसाद घेतला.
या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन करणारे सौ. राधिकाताई विष्णुप्रसाद भारती,शुभम दळवी,
सौ रमाकाकू दळवी,
संगीता काकू बुल,
सौ सुवर्णाताई भोंगाडे,वंदना ताई राऊत, दुर्गा बननागरे,
गौरी बननांगरे,
सौ चंदाताई लोखंडे,अर्चनाताई काळे, गीता ताई उंबरकर,श्रावणी भोंगाडे,ओम लोखंडे. आदी सर्व माता भगिनीं मंडळीनी सहकार्य केले.



