वर्धा विभाग प्रतिनीधी: – इम्रान खान
वर्धा : विनाकारण वाद घालून मारहाण करणाऱ्यास हटकले असता युवकावर चाकूने वार करत जखमी केले. ही घटना मारोती बुआ समाधी परिसरांत घडली. या प्रकरणी २६ रोजी रामनगर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.अमोल यशवंत वंजारी (रा. धंतोली) हा उमरी रोडवर असलेल्या जीवन नामक युवकाच्या हॉटेलात जेवण करण्यासाठी गेला होता. जेवण आटोपून तो परत जात असताना रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास मारोती बुआ समाधी परिसरात अमोल गेडाम त्याच्या मित्रांसह उभा होता. अमोल वंजारीला पाहताच अमोल गेडाम याने • ‘तू मेरे साथ क्यूँ नहीं रहता, तू बहुत बडा हो गया क्या?’ असे म्हणत शिवीगाळ करून मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. अमोल वंजारी याने मारहाण करण्यास मनाई केली असता अमोल गेडाम याने जवळील चाकू काढून त्याच्या हातावर वार करत त्याला जखमी केले. या प्रकरणी रामनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.


