अकोला विभाग प्रतिनिधी: – गणेश वाडेकर
बाळापूरः बँकेतून काढून आणलेले ६० हजार रुपये अज्ञात चोरट्याने पळविले; बाळापूर शहरातील दर्गा चौकातील घटना
बाळापूर शहरातील सतरंजीपूरा येथील इरफान खान सुभान खान यांनी बाळापूर स्टेट बँकेतून ६० हजार रुपये काढून कॅरीबॅगमध्ये
- ठेवले व कासारखेड येथील तोंड ओळख असलेल्या एका व्यक्तीच्या दुचाकीवर बसून दर्गा चौकापर्यंत गेले. शर्टला डाग लागलेला असल्यामुळे तो डाग धुण्यासाठी चहा टपरीवर जाण्यापूर्वी पैशाची कॅरीबॅग दुचाकीला अडकवली होती. मात्र वापस येथे आलो असता दुचाकीला अडकवलेली पैशाची कॅरी बॅगमध्ये दिसली नाही. या प्रकरणी त्यांच्या फिर्यादीवरून बाळापूर पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीवर दाखल करण्यात आला.



