अकोला विभाग प्रतिनीधी: – गणेश वाडेकर
अकोला:- बैल शेतात गेल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून चुलत पुतण्याने विळ्याने सपासप वार करून काकाचा खून केल्याची घटना आज सुमारास पिंजर पोलिस ठाणे अंतर्गत बोरगाव खुर्द येथे घडली. गोपाल मोतीराम ढोरे व आरोपी विशाल विलास ढोरे या चुलत काका व पुतण्याची शेती एकमेकांशेजारी आहे. शेताच्या वादातून त्यांचा नेहमीच वाद होत होता. दरम्यान, गोपाळ ढोरे यांचा बैल आरोपीच्या शेतात गेला. त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला. हा वाद तेजस तुळशीराम ढोरे (१९) हा त्याच्या शेतातून पाहत होता. त्यानंतर आरोपी दुचाकीने घरी गेला.


