अकोला विभाग प्रतिनीधी :- गणेश वाडेकर
अकोला अल्पवयीन मुलीला घेऊन युवक पसार; गुन्हा दाखल !
पातूर पोलिस स्टेशनअंतर्गत एका गावातील अल्पवयीन मुलीस घेऊन युवक पसार झाल्याची घटना आज घडली. याप्रकरणी तक्रारीवरून पातूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. १६ वर्षीय मुलगी घरात एकटी असताना आरोपी प्रवीण रमेश हानोरे (२३) हा घरात जाऊन तिच्यासोबत बोलत होता. यावेळी तिचा भाऊ घरात आला व त्याने आरोपीला ‘तू येथे काय करीत आहे’, असे विचारले. आरोपीने काही न बोलता त्याला मारहाण करून बाथरूममध्ये कोंडले व अल्पवयीन मुलीला घेऊन पसार झाला. ही घटना मुलीची आई घरी आल्यानंतर समोर आली.


