वर्धा प्रतिनीधी:- इम्रान खान….
संविधान जनजागरण रॅली काढून करण्यात आले प्रबोधन….
२६ नोव्हेंबर या संविधान दिनाचे औचित्य साधून सतत दरवर्षी गेली २००७ पासून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मार्गदर्शनात तथागत बौद्ध विहार संस्था, बौद्ध पंचायत समिती जेतवन बौद्ध विहार,पुलफैल संबुध्द महिला मंडळ व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या विद्यमाने पुलफैल येथून शहरातील विविध भागात फेरी करून संविधान जनजागरण रॅली काढून प्रबोधन करण्यात आले आणि रॅलीची सांगता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण व संविधान प्रस्ताविकेचे वाचन सामुहिक रित्या करून करण्यात आले.
ज्ञात असो कि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने शहिद डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या कल्पनेतून भारतात पहिल्यांदाच संविधान महोत्सव सुरू करून संविधान जनजागरण करायला सुरुवात केली तेव्हा पासून वरील संघटना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हा उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्त्या शारदाबाई झामरे यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी २६ नोव्हेंबरला संविधान रॅली काढून प्रबोधन करण्यात येते याही वर्षी त्यांच्या नेतृत्वाखाली संविधान जनजागरण रॅली काढून प्रबोधन करण्यात आले यावेळी संविधान प्रस्ताविकेचे वाचन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार यांनी उपस्थिताकडून करवून घेतले यावेळी शारदाताई झामरे सुस्मिता रामटेके, रंजना पाटील, ममता वालदे सुनिता सोनवणे,प्रतिक्षा वालदे मयूरी वालदे, वंदना हुमने,प्रतीभा उरने,छाया माठे,सिमा सुखदेवे,माला पाटिल, प्रियंका करोडे,सुरेखा रामटेके, स्मिता रामटेके,प्रिती पाटील,माया माधवे, प्रमिला पाटील,प्रतीभा उर्णे, वंदना नाईक,माया कुबडे आदी सहभागी झाले.

