अकोला विभाग प्रतिनीधी :-गणेश वाडेकर
अकोला:- स्थानिक सहकार नगर येथील एका ज्वेलर्समधून सोने खरेदी केल्यानंतर ‘फोन पे’ द्वारे पैसे पाठविल्याचे सांगून ३५ हजार रुपयांनी सराफा व्यावसायिकाची फसवणूक करणाऱ्या आरोपीस खदान पोलिसांनी सोमवारी अटक केली. अंकुश दीपक यादगिरे (२४) असे आरोपीचे नाव असून तो बाळापूर तालुक्यातील खंडाळा येथील रहिवासी आहे. सहकार नगरमधील शिवरत्न ज्वेलर्स या सोन्याच्या दुकानातून एका इसमाने चांदीचे फॅन्सी पायल २९० ग्रॅम, प्लेन जोडवे १० ग्रॅम, फाईन अंगठी जेंट्स ३ ग्रॅम, मजुरी १ हजार रुपये असे एकूण ३७ हजार ३२ रुपयांची खरेदी केली.


