अकोला विभाग:- गणेश वाडेकर.
अकोला:- जुन्या वादातून शिवीगाळ करून चाकूने हल्ला केल्याची गुजराथीपुरा भागातील लक्ष्मी मंदिराजवळ घडली. यामध्ये एक व्यक्ती जखमी झाला. राम अनिल भुसारी हे बाजारातून घरी जात असताना गोपाल गणपत शिंदे व अक्षय गणपत शिंदे यांनी लक्ष्मी मंदिराजवळ जुन्या वादातून शिवीगाळ करून त्यांना अडविले व जवळील धारदार चाकूने वार केला. या हल्ल्यात राम भुसारी गंभीर जखमी झाले. याप्रकरणी जखमी व्यक्तीच्या आई उज्ज्वला भुसारी यांनी बाळापूर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली.पुढील तपास पोलीस करत आहेत.


