वर्धा विभाग:- इम्रान खान
वर्धा:– सेलू तालुक्यातील चोंडी जंगलात अवैधरित्या गावठी दारु गाळली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकून ४ लाख २३ हजारांचा दारुसाठा नष्ट करुन दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
आशिष रॉय व महेश बंडेवार दोघेही रा. हिंगणी असे आरोपीचे नाव असून दोघेही फरार झाले. पोलिसांनी माहितीच्या आधारे चोंडी जंगलात वॉश आऊट मोहिम राबवून १३ लोखंडी ड्रममधील २ हजार ६०० लिटर कच्चा मोहा सडवा, २० लोखंडी ड्रम, तसेच गावठी दारु असा एकूण ४ लाख २३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच आरोपीविरुद्ध सेलू पोलिसांत गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, हवालदार नरेंद्र पाराशर, नितीन इटकरे, सागर भोसले, संघसेन कांबळे व मिथुन जिचकार आदींनी केली. यामुळे सेलू तालुक्यातील दारुविक्रेत्यांमध्ये धडकी भरली आहे.


