गणेश राठोड तालुका प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड : कराटे क्षेत्रात आपल्या कौशल्याची चमक दाखवत संस्कार पोदार लर्न स्कूल च्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी आपले स्थान मिळवले आहे. जिल्हा क्रीडा संकुल, यवतमाळ येथे झालेल्या विभागस्तरीय कराटे स्पर्धेत सोहम कदम, पियूश देशमुख, आणि प्रथमेश काचगुंडे यांनी जिल्हाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यातील १४ वर्षे वयोगटातील सोहम कदम व १७ वर्षे वयोगटातील पियूश देशमुख या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत निवड करण्यात आली.स्पर्धेत ५० हून अधिक शाळांनी सहभाग घेतला होता. विविध वयोगटांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेत कौशल्य सादर केले. या विद्यार्थ्यांनी कुमीते (सामना) प्रकारांमध्ये प्रभावी प्रदर्शन करून गुणांचे महत्त्वपूर्ण बिंदू मिळवले.राज्यस्तरीय स्पर्धा याच महिन्यात धुळे येथे आयोजित करण्यात येणार आहे. या यशामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून त्यांनी स्पर्धेत आणखी चांगली कामगिरी करण्याचा निर्धार केला. व या यशाचे खरे शिल्पकार कराटे प्रशिक्षक सचिन शिंदे हे असल्याचे मत विद्यार्थ्यांनी त्यावेळी व्यक्त केले. विद्यार्थांच्या या नेत्रदीपक यशाबद्दल संस्थेचे सर्व माननीय संचालक राजेश देशमुख,अजय क्षीरसागर, निशांत बयास व धिरज बागडे, शाळेचे प्राचार्य डॉ. भैरोबा मुंजाळ, प्रशासकीय अधिकारी मा. अतीश दिघेवार, क्रीडाशिक्षक राहुल राठोड व भावेश पटेल, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजेत्यांचे अभिनंदन करत त्यांना आगामी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. पालकांनीही आपल्या मुलांच्या यशाचा आनंद व्यक्त केला आहे.


