सातारा विभाग:- माण तालुका प्रतिनिधी निलेश कोकणे.
मा. राधाकृष्ण विखे पाटील साहेबांची माण खटावचे चौथ्यांदा आमदार जयकुमार गोरे भाऊ यांनी भेट घेतली. यावेळी विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिष्टचिंतन केले. तसेच याप्रसंगी त्यांनी माण खटाव मतदारसंघातील विजयाबद्दल भाऊंचा सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी त्यांच्याशी मनमोकळा संवाद झाला.
याप्रसंगी सहकारी ॲड आ. राहुल कुल, मा. खा. सुजय विखे पाटील, आमदार मा.शिवाजीराव कर्डीले, मा.विक्रमसिंह पाचपुते आदी उपस्थित होते.



