वर्धा विभाग प्रतिनीधी: – युसूफ पठाण
- विदर्भ बालनाट्य जत्रा या राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेचा यशस्वी समारोप.
- बालकलाकारांच्या उत्कृष्ट सादरीकरणाने प्रेक्षक झाले मंत्रमुग्ध
वर्धा येथे दिनांक. ७,८,९ फेब्रुवारी २०२५ रोजी विदर्भ बालनाट्य जत्रा या राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
वर्धा येथे नाट्यप्रतिक अकॅडमी प्रस्तुत “विदर्भ बालनाट्य जत्रा” या स्पर्धेचा शानदार समारोप नुकताच पार पडला. या स्पर्धेत राज्यभरातून आलेल्या बालकलाकारांनी आपल्या अप्रतिम अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकली.
स्पर्धेत एकूण १८ संघ सहभागी झाले होते. विविध सामाजिक, शैक्षणिक आणि मनोरंजनात्मक विषयांवर आधारित नाटकांचे सादरीकरण करण्यात आले. स्पर्धेतील परीक्षकांनी बालकलाकारांच्या अभिनयसंपन्न सादरीकरणाची प्रशंसा केली.
स्पर्धेतील विजेत्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत:
सर्वोत्कृष्ट बालनाट्य : “तेरा मेरा सपना टीव्ही हो अपना”, अद्वैत, अमरावती
उत्कृष्ट बालनाट्य : “घायाळ पाखर”, अश्वघोष कला अकादमी, नागपूर
उत्तम बालनाट्य : “स्कॉलरशिप”, स्वानंद सांस्कृतिक मंडळ, नागपूर
प्रोत्साहनपर बालनाट्य १ : “माणसं”, गायत्री कॉन्व्हेन्ट, नागपूर
प्रोत्साहनपर बालनाट्य २ : “झेप”,शिल कला सागर, नागपूर
तसेच, विशेष उल्लेखनीय अभिनयासाठी मुलीनं मध्ये ,”स्नेहा तराळ”हिला ‘सर्वोत्कृष्ट अभिनय मुली,”अनन्या मोदी” हिला ‘उत्कृष्ट अभिनय मुली’, “भविका मते”हिला ‘उत्तम अभिनय मुली’, कौमुदीनी सापेकर हिला प्रोत्साहनपर प्रथम, “सौम्या भोंडवे” हिला प्रोत्साहनपर दृतीय, ही पारितोषिक प्राप्त झाली, तसेच विशेष अभिनयासाठी मुलानं मध्ये”श्रुतीक चंदनावद” ला ‘सर्वोत्कृष्ट अभिनय मुले’,”राघव जोशी”ला ‘ उत्कृष्ट अभिनय मुले’, “वांशकुमार सिंह” ला ‘उत्तम अभिनय मुले’,”कौशिक गणेशे” ला ‘प्रोत्साहनपर प्रथम’,”अद्वैत ताराळ” ला ‘प्रोत्साहनपर दृतीय’ ही पारितोषिक प्राप्त झाली.
या तीन दिवसीय बालनाट्य जत्रेस लाभलेले परीक्षक मा. श्री. गोविंद गोडबोले सर (मिरज), मा. श्री. विकास फटिंगे सर (वर्धा), मा. श्री. सुनील तीतरे सर (वर्धा), त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बालनाट्य स्पर्धेचे महत्त्व आणि त्यातून मुलांना मिळणाऱ्या शिक्षणाच्या संधींबद्दल भाष्य केले.
समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मोहन बाबू अग्रवाल, विषेश उपस्थिती म्हणून संजय इंगळे तिगावकर, सुधीर पांगुळ, हरीश इथापे, प्रशांत गिरडकर, धोटे, प्रशांत जरोंडे, पंकज मानेकर, अभिजित पाडगावकर, सागर मेने, नानासाहेब देशमुख, धनंजय नाखले उपस्थित होते.
स्पर्धेचे आयोजन नाट्यप्रतिक थिएटर अकॅडमी चे संस्थापक प्रतिक सूर्यवंशी यांच्या वतीने करण्यात आले होते. संयोजकांनी यशस्वी कार्यक्रमासाठी सर्व सहभागी संघ, शिक्षक, पालक आणि प्रेक्षकांचे आभार मानले.
या स्पर्धेच्या माध्यमातून लहानग्या कलाकारांना अभिनयाची उत्तम संधी मिळाली असून, त्यांच्या लपलेल्या बहुगुणाना वाव मिळावा आणि भविष्यातही अशाच प्रकारच्या उपक्रमांना पाठिंबा त्यांना संधी मिळून देऊ असे आश्वासन आयोजकांनी दिले.
कार्यक्रम यशस्वी करण्यामाघे प्रतिक सूर्यवंशी, विभा भोयर, पूनम बोबडे, अदिती देशमुख, तुषार बोबडे, भारती कावडे, दिलीप भोयर, साक्षी हिवरे, सलील देशपांडे, प्रियांका देशपांडे, पौर्णिमा शिंदे, प्रिया मानमोडे, दीपिका झाडे, ईश्र्वरी झाडे, सौम्या भोंडवे, संहिता देशमुख, सात्विक शिंदे, नंदिनी गुढेकार, श्रुती देशमुख, अर्थव मानमोडे, अस्मि देशपांडे, अन्वि देशपांडे, चारवी शंभरकर, परी श्रीवास, तस्म्यी चूने यांनी परिश्रम घेतले.


