यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी :-कैलास कोडापे
- वाढोणा येते 55 हजाराची भव्य लुट
राळेगाव तालुक्यातील छावा क्रीडा मंडळ वाढोणा (बाजार) यांच्या वतीने राळेगाव तालुक्यात प्रथमच 56 किलो आतील वजन गटाचे 32 संघांमध्ये लीग मॅचेस होत आहे दिनांक 14 /2/ 25 पासून सामन्याला सुरुवात होत असून भव्य बक्षिसाची लूट यावेळी ठेवण्यात आलेली आहे.
प्रथम पुरस्कार 25,000, द्वितीय पुरस्कार 15,000, तृतीय पुरस्कार 10,000 चतुर्थ पुरस्कार 5000 अशा प्रकारे बक्षीस ठेवण्यात आले, तरी तालुक्यातील कबड्डी प्रेमींनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे मंडळातर्फे आव्हान करण्यात येत आहे. येणाऱ्या खेळाडूंची जेवणाची व राहण्याची व्यवस्था मंडळातर्फे केली जाईल सर्व सामने हे प्रो कबड्डी च्या खेळविले जाईल व सामान्य मध्ये संघ वाढल्यास फेरबदल होऊ शकतो असे छावा क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष श्री सुरज कडू यांनी म्हटले आहे. आणि वाढोणा (बाजार) गावामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

