यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी: -कैलास कोडापे
राळेगाव:-श्री शिवाजी बहुउद्देशीय विकास संस्था संचलित स्कूल ऑफ ब्रिलीयंट राळेगाव येथे दि.२३/०१/२०२५ रोजी एकदिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राळेगाव नगरपंचायत चे उपनगराध्यक्ष जानरावजी गिरी तसेच राळेगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार सिताराम म्हैत्रे गटशिक्षणाधिकारी राजु काकडे तसेच संस्थेचे अध्यक्ष पेंन्टना सर ,शौकत अली सर, रमेश सर,अन्वर सर हे लाभले होते तसेच प्रमुख अतिथी म्हणून प्रदीप ठूणे, धनंजय सेगेकर, राजेंद्र नागपुरे, संजय पोपट,पारस वर्मा,मनोज मानकर व संजय घिया सर होते.
कार्यक्रमात नर्सरी ते वर्ग दहावी च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.शाळेच्या परंपरेनुसार विशिष्ट संकल्पनेवर आधारित स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येते या वर्षी”LEHAR’The wave of change(बदलाची लाट)या संकल्पनेवर आधारित स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम प्रांगणात सादर करण्यात आला हे स्नेहसंमेलन केवळ नाट्य नृत्य यांचा आविष्कार न राहता ते विचाराचे संमेलन बनले आहे हे संमेलन अंतर्मुख करणारे होते असे प्रतिपादन प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले सांस्कृतिक कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहायक शिक्षक अन्वर सर , रमेश सर, मनिषा पोटे मॅडम यांनी योगाचे मार्गदर्शन केले तसेच शिक्षकवृंद कुलदीप वाघमारे, सतिश काकडे, महेश दैवलकर कनिष्ठ लिपिक आडे सर, ठाकरे सर इत्यादींचे सहकार्य लाभले.


