गणेश राठोड
*जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
निगनूर: वार्षिक यात्रेच्या निमित्ताने निगनूर गावात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत आहे. यात्रेतील सुव्यवस्था राखण्यासाठी बिटरगाव पोलीस स्टेशनच्या वतीने अत्यंत कडक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
यात्रेच्या संपूर्ण परिसरावर पोलीस कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नजर ठेवत आहेत. सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेसाठी तसेच कोणत्याही अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी बिटरगाव पोलिसांनी विशेष पथकांची नेमणूक केली आहे.

- यात्रेतील गर्दीचे व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण, चोरी किंवा अन्य घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे तैनात करण्यात आले आहेत. पोलिसांनी भाविकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून कोणत्याही प्रकारची संशयास्पद हालचाल आढळल्यास त्वरीत माहिती देण्याची विनंती केली आहे.
निगनूर यात्रेत भाविकांनी पोलिसांना सहकार्य करणे आणि यात्रा शांततामयपणे पार पाडण्यासाठी योगदान देणे गरजेचे आहे. बिटरगाव पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संतोष मनवर यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमदार रवी गिते पो कॉ हिमत जाधव व सहकारी कर्मचाऱ्यांचे यासाठी विशेष कौतुक होत आहे.

