अकोला विभाग प्रतिनीधी: – गणेश वाडेकर
शेतीच्या वादातून न्यायालयात सुरू असलेले प्रकरण मागे घेण्याची धमकी देत एका व्यक्तीस मारहाण, शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नऊ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शिवदास श्रीकृष्ण गावंडे (रा. तेल्हारा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दुपारी पत्नीसह दुचाकीने घरी जात असताना बसस्थानकाजवळ आरोपींनी त्यांना थांबवून लोखंडी रॉड व काठीने मारहाण करून जखमी केले. या तक्रारीनुसार पोलिसांनी मनोहर पांडुरंग यादगिरे यांच्यासह ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


