अकोला विभाग प्रतिनीधी: – गणेश वाडेकर
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने डिझेलच्या अवैध साठ्यावर कारवाई करत १०० लिटर डिझेल जप्त केले असून या प्रकरणी एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रॉयल ढाब्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. *शेख नदीम शेख अहमद (३८ वर्षे) रा. सुन्नाह हॉस्पिटल जवळ गंगा नगर याला ताब्यात घेतले आहे. *बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ग्राम कोळंबी शेतशिवारात असलेल्या रॉयल ढाब्यावर पेट्रोल-डिझेलचा* साठा करून त्याची अवैधरित्या विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.


