बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी :-सुनिल वर्मा
लोणार – शहरातील सर्व प्रभागातील नाल्या तुडूंब भरून आहे कर्मचाऱ्यांची कमी संख्या व नियोजन आभावी दोन दोन महिने नाल्यांचा नंबर लागत नाही.नबंर आली तरी दोन फुट खोल असलेली नाली पाणी थांबणार नाही अशी मोकळी केल्या जात आहे. मागे वृत्तपत्रात बातमी प्रकाशीत झाल्या पासून रोड वर कचराढिगार सफाई झाले असले तरी नाल्या साफ झाल्या नाही. पुर्ण साफ करायच्या तर फक्त त्यातील पाणी कसा समोर जाईल एवढच काम न.प.चे आलेले कर्मचारी करतात आलेल्या कर्मचाऱ्यांना पूर्ण नाली काढण्यासाठी सांगितले तर दोन माणसांनी नाली काढल्याजात नाही म्हणनत फक्त पाणी थांबणार नाही एवढच काम ते करतात. त्यामुळे नागरिकांना आपल्या घरा समोरील नाल्या साफ कराव्या लागत आहे. माती,दगळ,रेतीने भरलेल्या नाल्या साफ होतील कधी याची वाट शहरवासी करत आहे.

कर वसुलीसाठी स्वच्छतेचा मुद्दा न.प.ला भोवणार
मागील काही दिवसापासून लोणार शहरातील स्वच्छतेचा विषय अतीशय गंभीर झाला आहे. शहरात स्वच्छता विषयी शहरवासीयांची नाराजी आहे बऱ्याच वेळा नागरिक सोशल मीडियाच्या माध्यमातून फेसबुक, व्हाट्सअप माध्यमाने आपल्या समस्या व्यक्त करतात. मार्च मध्ये कर वसुलीसाठी घरासमोर डफळे वाजणाऱ्या न.प. अधिकारी व कर्मचारी यांना आरोग्य विभागाचे अपयश चांगलेच भोवणार एवढे मात्र खरे
आमच्या घरा समोरील नाली सहा महिन्यापासून काढली गेली नव्हती दोन दिवसा अगोदर कर्मचारी आले त्यांनी फक्त वरचा कचरा काढला नाली पुर्ण काढण्यासाठी अजून कर्मचारी लागतात दोन तिन माणसाने हे काढल्या जात नाही म्हणून त्यांनी फक्त पाण्याला वाट करून दिली. त्यामुळे मला स्वतः नाली साफ करावी लागते.


