अकोला विभाग प्रतिनिधी गणेश वाडेकर
सोशल मिडीया इंस्टाग्रामवर ओळखीचे रूपांतर प्रेमात झालेल्या एका अल्पवयीन मुलीकडे आरोपीने शरीर सुखाची मागणी केल्याची घटना जुने शहर पोलिस स्टेशन हद्दीमध्ये घडली आहे. या प्रकरणी पिडित अल्पवयीन मुलीने जुने शहर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. जुने शहर पोलिसांनी आरोपीविरूध्द पॉस्को सह विविध कल्मान्वये गुन्हे दाखल करून आरोपी युवकाला अटक केली आहे. एक अल्पवयीन मुलगी व जुने शहर पोलिस स्टेशन हद्दीतील रहिवासी आरोपी मुलाची सोशल मिडिया इंस्टाग्रामवर ओळख होऊन या ओळखीचे रूपांतर मैत्रीमध्ये झाले.


