अकोला विभाग प्रतिनीधी: – गणेश वाडेकर
घरासमोर कचऱ्याने भरलेले टोपले ठेवण्यावरून दोन गटांमध्ये वाद होऊन हाणामारी झाली. यामध्ये एक जण जखमी झाला असून, बार्शीटाकळी पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारींवरून ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत नजीमोदीन शेख निजामोदीन यांनी बार्शीटाकळी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. नगर पंचायतचे कचरावाहू वाहन आज आले होते. त्यांच्या घराजवळ संकुलातील लोकांनी कचऱ्याने भरलेले टोपले तसेच ठेवले होते. शेजारी राहणारे शेख मेहमूद शेख कलंदर यांनी घराजवळ कचरा का ठेवला अशी विचारणा करीत त्यांच्याशी वाद घालून शिवीगाळ केली.


