बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी :-सुनिल वर्मा
लोणार :– समर्थ नगर लोणार येथील दिडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ केंद्रात दत्त जयंती उत्सवानिमित्त अखंड गुरुचरित्र पारायण व अखंड नाम जप-यज्ञ सप्ताहाची सांगता महा आरती व महाप्रसादाने करण्यात आली. 16 डिसेंबर या वेळी हजारो सेवक व भाविकांनी महाराजांच्या आरतीचा व प्रसादाचा लाभ घेतला.

दिडोरी प्रणीत अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास मार्गच्या समर्थ नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात दत्त जयंती निमित्त आयोजित अखंड स्वामी नाम जप यज्ञ सप्ताह व सामूहिक गुरु चरित्र पारायण सोहळ 16 डिसेंबर रोजी महा आरती व महाप्रसादाने सांगता करण्यात आला.

यावेळी हजारो भाविक भक्तांनी महा आरती व महाप्रसादाचा लाभ घेतला या सप्ताहात अखंड स्वामी नामजप, अखंड विणा वदन, अखंड स्वामी चरित्र वाचन, मनोबोध याग, गीताई याग, चंडी याग, स्वामी याग, रुद्र याग, मल्हारी याग, तसेच दैनंदिन नित्यस्वाहकार, त्रिकाल आरती आणि सांध्यकाली को टाल मृदुगा सह औदुंबर प्रदक्षण, विष्णु सहस्त्र नाम, गीताई, मनाचे शोल्क, पसायदान, तुकाराम अभंग आदी धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. या काळात प्रथमच लोणारमध्ये १७१ गुरुचरित्र पाठ सेवा करण्यात आली, गुरुचरित्र पारायण 171 जणांनी केले. *मांदियाळी स्वरूपात महाप्रसाद*केंद्रात श्री दत्त जयंती उत्सवासाठी दरवर्षी महाप्रसादाचे आयोजन केले जाते, मात्र केंद्रात अन्न तयार केले जात नाहीकारण केंद्रातील प्रत्येक सेवेकरीला अन्नदानाचे पुण्य लाभावे त्यासाठी प्रत्येक सेवेकरीच्या घरातील रोटी, भाजी, मिठाई केंद्रात जमा होते विशेष म्हणजे हे सर्व पदार्थ एकत्र करून महाराजांना नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो आणि नंतर हा प्रसाद वितरित केला जातो या वर्षी हजारो भाविकांनी याचा लाभ घेतला.डॉ सुशील अग्रवाल सेवेच्या भावनेने ते चालवत आहेत.


