अकोला विभाग प्रतिनिधी:- गणेश वाडेकर
अकोला:- ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल सुदाम धुळगुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार *वैभव बबनराव वानखडे* हा युवक दहशत पसरण्याच्या उद्देशाने धारदार तलवार बाळगून असल्याची गुप्त माहिती मिळाली असता ठाणेदार श्रीधर गुठे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मनीषा सामटकर, हेड पोलीस कॉन्स्टेबल विजय मानकर यांच्यासह ग्राम वडगाव येथे शनिवार १४ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता पोहोचलो वैभव बबनराव वानखडे यांच्या घराची झडती घेतली तर सोयाबीनच्या पोत्यामध्ये तलवार आढळून आली आरोपीला अटक करून गुन्हा दाखल केला.


