बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी :-सुनिल वर्मा
प्रतिनिधी:- महिलांनी आपली नारीशक्ती ओळखून राजकारण व समाजकारणात सक्रिय व्हावे स्थानिक स्वराज्य संस्थेवर आपला झेंडा रोवावा असे वक्तव्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला मेळाव्यात जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे यांनी केले.शिवसेना भवन लोणार येथे डॉ. गोपाल बछिरे यांच्या अध्यक्षतेखाली व महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ विजयाताई खडसन, तालुकाप्रमुख ऍड दीपकभाऊ मापारी, शहर प्रमुख गजानन जाधव यांच्या प्रमुख प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या मेळाव्याच्या अध्यक्षीय समारोपात ते बोलत होते. आपल्या वक्तव्यात डॉ. बछिरे यांनी गाव तिथे शाखा व घर ते शिवसैनिक या संकल्पनेवर भाष्य करून महिलांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतील आरक्षणाचा लाभ घेऊन जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, ग्रामपंचायती यांच्या निवडणुकी लढण्यास सज्ज राहावे व आपले अस्तित्व समाजात प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करावा. या महिला मेळाव्यास, महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ विजयाताई खडसन, तालुकाप्रमुख ऍड दीपकभाऊ मापारी, शहर प्रमुख गजानन जाधव सर यांनी मार्गदर्शन केले व जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर व जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्या परवानगीने जिल्हा तथा तालुक्याच्या महिला पदाधिकारी यांची निवड करून त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले लोणार मेहकर विभाग महिला जिल्हा उपप्रमुखपदी संजीवनीताई वाघ, चिखली विभाग उपजिल्हाप्रमुखपदी सौ कल्पनाताई बोधेकर, मेहकर विधानसभा संघटक पदी सौ नगमाताई गवळी, लोणार तालुका प्रमुखपदी सौ ताराबाई जायभाये, लोणार शहर प्रमुखपदी श्रीमती पार्वतीताई सुटे, लोणार तालुका उपप्रमुखपदी सौ शालिनीताई मोरे, वढव वेणी विभाग प्रमुखपदी सौ जिजाताई बाजड, वढव शाखाप्रमुख पदी सौ जिजाताई चाटे यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले, याप्रसंगी नगरसेविका सौ सिंधुताई जाधव, शिवसेना ज्येष्ठ नेते गोविंद बोधेकर, शहर उपप्रमुख लूकमान कुरेशी, शहर संघटक तानाजी मापारी, युवा शहर प्रमुख श्रीकांत मादनकर, विभाग प्रमुख तानाजी अंभोरे, योगेश भुक्कन, मंगेश मोरे , शिवाजी बाजड, समर्जीत बछीरे, सौ रंजनाताई बछीरे, सौ रुक्माई वानखडे, सौ सीमाताई वानखडे, सौ मीराताई बाजड यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीवनीताई वाघ यांनी केले तर आभार श्रीकांत मादनकर यांनी मानले.


