अकोला विभाग प्रतिनीधी: – गणेश वाडेकर
प्रतिनीधी: – अकोला जिल्ह्यातील सर्व दिवाणी व फौजदारी न्यायालये तसेच कामगार न्यायालय, सहकार न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, औद्योगिक न्यायालय व जिल्हा ग्राहक तक्रार आयोग, अकोला येथे राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले. अकोला जिल्ह्यातील सर्व न्यायालयात प्रलंबित प्रकरणांपैकी *एकूण १२ हजार २९६ प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये तडजोडीकरिता ठेवण्यात आली होती. त्यापैकी एकूण १ हजार ५२६ प्रलंबित प्रकरणांत व एकूण ४ हजार ८९६ दाखलपूर्व प्रकरणांत समेट घडून आला. अशी एकूण ६ हजार ४२२ प्रकरणे निकाली काढण्यात*आली.



